EVENT PORTFOLIO

Translate page to

मराठी English

Click to View
PHOTOS

Shreya Ghoshal - Live in Concert

Undisputed queen of music is a befitting title for Shreya Ghoshal who is the leading singer of our times. The range of songs that she renders is incredibly vast; from those sung by Lata Mageshkar and Asha Mangeshkar to recent ones like “mohe rang de lal” and “ghumar...”. Each song has a distinct style but she manages them with finesse. At every stage performance, she casts a magical spell on the audience; enthralling it, mesmerizing it!

श्रेया घोषाल - लाईव्ह इन कॉन्सर्ट

सुरांची सम्राज्ञी असं जिला म्हटलं जातं ती म्हणजे आजच्या पिढीची आघाडीची गायिका श्रेया घोषाल... लता दिदी, आशाताईंच्या गाण्यांपासून ते आत्ताच्या "मोहे रंग दे लाल' ते "घुमर' पर्यंत वेगवेगळा बाज असलेली गाणी लिलया गाणारी ही गायिका जेव्हा रंगमंचावर अवतरते तेव्हा तिच्या सुरेल आवाजाची जादू रसिक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडते.

Murtimant Asmita - A voyage called Smita Patil

Smita Patil, known as an actress who carved a niche for herself in the Marathi and Hindi film industry with her exemplary and powerful acting skills

Umbartha, Jait re jait, arth, Ardhasatya, Mirchmasala, Mandi, Debashish, Thikana, Namakhalal, Shakti, Waris and many other films showcase her unmatched talent. An audio visual programme comprising some scenes from her popular films and rendition of songs that were enacted by her on the screen. Author: Lalita Tamhane

मूर्तिमंत अस्मिता - स्मिता पाटील नावाचा प्रवास

मराठी, हिंदी चित्रपटात आपल्या सशक्त, समृद्ध अभिनयाने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री अशी स्मिता पाटील हिची ओळख! उंबरठा, जैत-रे-जैत, अर्थ, अर्धसत्य, मिर्चमसाला, मंडी, देबाशिश, ठिकाना, नमकहलाल, शक्ती, वारीस असे अनेक चित्रपट तिच्यातील सशक्त अभिनेत्रीची ओळख पटवून देतात. अशा तिच्या काही गाजलेल्या चित्रपटातील दृष्ये (चित्रफित) आणि तिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचा एक दृकश्राव्य कार्यक्रम... लेखन : ललिता ताम्हाणे

Diwali Pahat

Diwali a propitious festival of light and prosperity is the most important festival for Maharashtrians. Celebrated with great joy and fervour, the “Padva” marks the beginning of the New Year. On the auspicious occasion of Diwali we organise a concert (since 2006) that can be enjoyed with ones loved ones, friends and family alike, whilst exchanging greetings and good wishes at dawn in a blissful ambience, and soaking in melodious scores. This gala event is celebrated in the presence of many stalwarts and sets the tone of wondrous success for the upcoming year.

दिवाळी पाहट - मराठी सणांमध्ये सर्वात महत्त्वाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण... दिवाळी

मांगल्याचा, प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण ही या सणाची ओळख! दिवाळी पाडव्याला नववर्ष प्रारंभ होतो म्हणूनच... अशा या मंगलसमयी आप्त स्वकीयांसह, मित्रपरिवारासह पहाटे-पहाटे एकमेकांना शुभेच्छा देत-देत भक्तीपूर्ण वातावरणात... स्वराचांदण्यांचा वर्षाव करणार्‍या सुरेल, भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन... २००६ पासून दरवर्षी केले जाते. विविध मान्यवरांच्या साक्षीने दरवर्षी हा कार्यक्रम एक आनंदसोहळा ठरतो... येणार्‍या नव्या वर्षासाठी खूप काही देणारा ठरतो...

Sachin Tendolkar[Bharatratna]

An Family Event organized for him.

सचिन तेंडुलकर [भारतरत्न]

त्यांसाठी केलेला एक फॅमिली इव्हेंट.

"Chehere" - Book Launch

Guatam Rajadhyaksha more popularly known as the “Wizard of Photography”, his book titled “Chehere” was released in the presence of many illustrious and well-known artists.

चेहरे - प्रकाशन सोहळा

फोटोग्राफी मधील जादुगार गौतम राज्याध्यक्ष यांच्या ‘चेहरे’ या पुस्तकाचा अनेक नामवंत, दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत...

Phir Rafi

Invaluable gems of Late Mohammed Rafi’s memorable journey A musical odyssey organised every year since 2008, on the occasion of the death anniversary of Late Mohammed Rafi. Programmes are organised consecutively from 29th July to 2nd August at different venues. The highlight of these programmes is the rendition of Mohammed Rafi’s songs by well-known singer Shrikant Narayan in his mellifluous voice. Presented by Shrikant Narayan, Sarita Rajesh.

फिर रफी

स्व. मोहम्मद रफी के सदाबहार नगमों का यादगार सफर... २००८ पासून... स्व. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ‘फिर रफी’ या सांगितिक महोत्सवाचे प्रतिवर्षी आयोजन! २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत निरनिराळ्या ठिकाणी सलग या कार्यक्रमाचे सादरीकरण! प्रतिथयश गायक श्रीकांत नारायण यांच्या सुरेल आवाजात... मोहम्मद रफी यांची अनेक गाजलेली गाणी हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. सादरकर्ते : श्रीकांत नारायण, सरिता राजेश

Pal Pal Kishore

Kishore Kumar - a multifaceted personality - Actor, Producer, Director, Singer, Music Director! All his songs gained immense popularity, so much so that it is almost impossible to select the best from the thousands of lilting numbers churned out by him. We humbly presented an orchestra of the best of the best from amongst the outstanding numbers.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गायक, संगीतकार असे अष्टपैलु व्यक्तीमत्त्वस्व.

किशोर कुमार यांची सर्वच गाणी गाजली. कोणतं गाणं सर्वोत्तम... हे ठरवणं अत्यंत कठीण! अशा हजारो गाण्यातून निवडलेली सुरेल मैफिल

Nutan, “Chand Phir Nikala

Release of book on legendary actress Nutan written by Lalita Tamhane followed by a programme of songs that featured Nutan, with worthwhile glimpses of her ingenious acting. Impeccable and aesthetically pleasing in all aspects!

नूतन, चांद फिर निकला...

सुप्रसिद्ध अभिनेत्री नूतनच्या जीवनावरील ललिता ताम्हाणे लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सादर झालेला कार्यक्रम... नूतन वर चित्रित झालेली गाणी आणि तिच्या सदाबहार अभिनयाच्या रम्य आठवणी असा हा नेटका, सर्वांगसुंदर कार्यक्रम!.

“Twogether” – Live in Concert

A concert of notes set in modern music accompanied by classical music beats! Shankar Mahadevan and Ustad Zakir Husain’s jugalbandi enthralled the audience, who were completely immersed in music.

“Twogether” - लाईव्ह इन कॉन्सर्ट

शास्त्रीय संगीतातील ताल आणि त्याला आधुनिक स्वरांची जोड अशी ही सुर-तालाची मैफिल!शंकर महादेवन आणि उस्ताद झाकिर हुसेन यांच्या जुगलबंदीतून साकारलेली...रसिक प्रेक्षकांना आकंठ सुरांत चिंब भिजविणारी!

Nitin Gadkari

An exquisitely decorated stage, orchestra of 40 musicians and celebrity singers set the tone for a mellifluous evening exclusively for Nitin Gadkari. No stone was left unturned to ensure that he gets the ethereal experience of sublime music to enable him to detach himself from his usual political frenzy.

नितिन गडकरी

40 कलाकारांचा भव्य वाद्यवृंद, सजलेला रंगमंच आणि सेलिब्रेटी गायकांची वर्णी. नितिन गडकरी साहेबांसाठी सजलेली एक सुरांची संध्याकाळ. राजकारणाच्या व्यस्त कारभारातून निवांतपणाचे काही सुखद क्षण या मैफिलीमुळे त्यांना मिळावेत यासाठीची छोटीशी धडपड...

Wedding Events

Along with musical shows, conferences, corporate events we are active in organising wedding events successfully which is significant in our journey. We offer package services in terms of bridal make-up, mehendi, mehendi decoration, sangeet ceremony, choreography, traditional baraat (groom’s wedding procession), stage decoration, theme wedding, destination wedding, pre and post wedding photography to name a few.

लग्न सोहळा

विविध म्युझिकल शोज्, कॉन्फरन्स, कॉर्पोरेट इव्हेंन्टस् यासोबत वेडिंग इव्हेन्टस् सुद्धा जीवनगाणीच्या वाटचालीतील महत्त्वाचे...

ब्रायडल मेकअप, मेहंदी, मेडंदी डेकोरेशन,संगीत, कोरीओग्राफी, पारंपारीक बारात, व्यासपीठ सजावट, थीम वेडिंग, डेस्टीनेशन वेडिंग, प्री व पोस्ट वेडिंग फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी अशा बाबतीत जीवनगाणीने अनेक सोहळे यशस्वी केले... पेशवाई पद्धतीने समारंभ आयोजन व्याही भोजनासाठी पेशवाई पद्धतीचा संपूर्ण थाट-माट, येणार्‍या मान्यवरांचं पेशवाई उपरणं पगडी देऊन स्वागत, पेशवाई पद्धतीने बैठक व्यवस्था, आणि त्याच दिमाखात, आकर्षक रंगसंगतीने, उत्तम नियोजन हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य!

Yadon Ka Chala Karva

A musical odyssey of old Hindi songs organised on the occasion of annual employee get together or during corporate parties for companies like Indian Oil; reminiscing the famous singers, artists and music composers of the Hindi Film Industry.

यादों का चला कारवॉं

इंडियन ऑईलसारख्या विविध कॉर्पोरेट कंपनीजसाठी दरवर्षी होणाऱ्या स्नेहमेळाव्या निमित्ताने हिंदी जुन्या गाण्यांचा एक सुरेल प्रवास म्हणजे यादों का कारवॉं. हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले गायक/कलाकार/संगीतकार यांच्या आठवणींना पुन्हा नव्याने स्मरणारी मैफल...